Ad will apear here
Next
राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात
अधिवेशनाची तयारीपुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) आयोजित राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एसएसपीएमएसच्या मैदानावर होणाऱ्या या अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारला जात असून, राज्यभरातून लाखो रिपब्लिकन कार्यकर्ते २७ मे २०१८ रोजी पुण्यात दाखल होत आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

याबाबत माहिती देताना रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेले हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. शहराच्या विविध भागात कोपरा सभा, बैठका घेऊन अधिवेशनाबाबत जागृती केली जात आहे. लोकांच्या सोयीसाठी विभागावर बस व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था, स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणत्याही कार्यकर्त्याची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.’

अधिक माहिती देताना जानराव पुढे म्हणाले, ‘व्यासपीठाला दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे नाव देण्यात आले आहे, तर स्वागत कमानींवर नामदेव ढसाळ, प्रा. रामनाथ चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे आणि लतिका साठे यांची नावे देण्यात आली आहेत. रविवारी सकाळी देशभरातून आलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे अल्पबचत भवन येथे संमेलन होणार आहे. पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि आगामी निवडणुकीतील भूमिका यावर विचारमंथन होणार आहे.’

‘या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत,’ असेही जानराव यांनी सांगितले.

अधिवेशनाविषयी :
दिवस : रविवार, २७, मे २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : एसएसपीएमएसचे मैदान, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZMJBO
Similar Posts
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला
पुण्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता पुणे : दिव्य ज्योती परिवार आणि दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या शिष्या आणि भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली
‘आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यात महातेकरांचे योगदान मोलाचे’ पुणे : ‘अविनाश महातेकर हे अतिशय प्रांजळ, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. विचारांशी एकनिष्ठ राहत आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिलेले आहे. समाजाचा सर्वांगीण विकास हे बाबासाहेबांचे सूत्र आणि माणसाला जोडणारे बुद्धांचे तत्त्वज्ञान जगणाऱ्या महातेकरांनी आंबेडकरी चळवळीच्या कार्यात यापुढेही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language